संपदाचे यश ओबीसींसाठी अभिमानास्पद – विक्रम गोजमगुंडे

0
संपदाचे यश ओबीसींसाठी अभिमानास्पद - विक्रम गोजमगुंडे

लातूर (एल पी उगिले)
संपदा वांगे हीने ग्रामीण भागात राहून युपीएससीसारख्या कठीण परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून, लातूर जिल्ह्यातील शिक्षणाच्या पॅटर्नला झळाळी प्राप्त करून दिलेली आहे. त्याचबरोबर तिला मिळालेले यश हे तमाम ओबींसीसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगून संपदा हिने भावी आयुष्यात जिल्हाधिकारी व्हावे, अशा शुभेच्छा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात असलेल्या नारवट वाडी येथील संपदा धर्मराज वांगे हिने युपीएससी परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले. या यशाबद्दल माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी वांगे परिवाराची भेट घेवून संपदा हीचा सत्कार करत तिला शुभेच्छा दिल्या. संपदा वांगे हिने नारवट वाडीसारख्या छोट्याशा गावात राहून घरात स्पर्धा परिक्षाची पार्श्वभूमी नसताना जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर युपीएससी सारख्या अवघड परीक्षेत यश प्राप्त केले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण रेणापूर तालुक्यात तर माध्यमिक शिक्षण लातुरात झालेले आहे. त्याच बरोबर महाविद्यालयीन शिक्षण लातूर व पुणे येथे पार पडले आहे. युपीएससी सारख्या परीक्षेला सामोरे जाताना तिला अनेक अडचणीही आल्या. मात्र तिने त्या अडचणीवर मात करत हे यश गाठले आहे. त्याचबरोबर तिला घरच्यांचाही तितकाच पाठींबा मिळाल्याने हे सहज शक्य झाले असल्याचे संपदाने सांगितले. विशेषत: आई निर्मला वांगे हिने सातत्याने यासाठी आपल्याला प्रोत्साहीत केले असल्याचे, संपदाने सांगितले.
विक्रम गोजमगुंडे यांनी ओबीसी समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा, यासाठी विक्रम गोजमगुंंडे यांनी केलेले कार्य अतुलनिय असून गोजमगुंडे परिवारानेही नेहमीच चांगल्या कामासाठी पाठबळ दिले असल्याची भावना वांगे परिवारानी यावेळी व्यक्त केली.संपदाला मिळालेले यश तमाम जिल्हावासियांसह ओबीसी समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगून तिच्या या यशामुळे ओबीसी समाजातील हुशार आणि होतकरू विंद्यार्थ्यांना प्रेरणादायी असेल, असे विक्रम गोजमगुंडे यांनी यावेळी सांगितले. संपदा लवकरच आयएएस होवून ती जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत व्हावी, अशी शुभेच्छा देवून तिच्या माध्यमातून चांगले कार्य घडावे असेही गोजमगुंडे म्हणाले.
यावेळी चेतन कोले, सुरेश भंडारे यांच्यासह वांगे कुटूंबिय व समाज बांधव उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!