महापुरुषांची जयंती उत्सव जाती धर्माचे ऐवजी मानव धर्माच्या दृष्टिकोनातून संपन्न व्हावेतः-ग्रंथमित्र दीपक बलसूरकर
उदगीर (एल पी उगिले)महापुरुषांची जयंती उत्सव किंवा पूण्य स्मरणार्थ कार्यक्रम करताना जातीधर्माच्या पलिकडे जाऊन सर्व धर्म समभाव दृष्टीकोनातून समाजातील सर्व घटक एकत्र येऊन उत्सव साजरा करावा, तेव्हा आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्र प्रेम भावना वृद्धिंगत होऊन, राष्ट्र सशक्त व ऐक्यभावना समृद्ध होतील. असे विचार ग्रंथ मित्र दीपक बनसुरकर यांनी व्यक्त केले. ते कर्नाटक राज्यातील सावरगाव येथील विश्वमानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते . या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त बँक अधिकारी मूरलीधर जाधव हे उपस्थित होते. सर्व प्रथम गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुणाई ढोल ताशाच्या तालावर थिरकत होती. गाणी, घोषना,रोषणाई नटून सजून, आलेल्या माता भगिनी मध्ये प्रचंड उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत होते. प्रशासन व्यवस्था चोख होती. अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामवासियांचा सहभाग होता. प्रथम डॉ. बाबासाहेबाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडून केल्यानंतर ग्रंथ मित्र दीपक बलसूरकर यांनी मार्गदर्शन केले.
पूढे बोलताना ते म्हणाले, केवळ पूजन करून भागत नाही तर बाबासाहेबाच्या सद्गुणांचा व विचारांचा मागोवा घेत गेलो तर सर्व धर्म समभाव सूदृढ होऊन समाज एकसंध होण्यास मदत होईल. त्या साठी त्यांचे विचार अनूकरणीय आहेत. ते त्यांच्या पुस्तकातून आपण वाचायला हवेत. विना वाचने साध्य काही न होणे. असेही ते म्हणाले.या प्रसंगी गावातील आदर्श शिक्षक व एक आदर्श विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. संयोजन श्री बजरंग जी व सहकार्यानी केले. या कार्यक्रमात महिलावर्ग व तरुणाई ची उपस्थिती उल्लेखनीय होती.
