स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघ निवडणूक 2025 महायुतीचे भरत चामले यांनी निवडणूक अर्ज भरला
उदगीर (एल पी उगिले) उदगीर येथील स्व.रामचंद्रराव पाटील तळेगांवकर तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विद्यमान चेअरमन भरत चामले आणि त्यांच्या सहकारी संचालक मंडळांनी अतिशय उत्कृष्ट काम करून महाराष्ट्रामध्ये उदगीरच्या खरेदी विक्री संघाचा नावलौकिक निर्माण केला आहे. याच कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी भरत चामले यांची महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवड केली होती. मराठवाडा विभागाचे प्रतिनिधी म्हणून तेथे देखील भरत चामले यांनी उत्कृष्ट कार्य केले. उदगीर तालुका खरेदी विक्री संघाला या संघाचे संस्थापक सहकार महर्षी स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर यांचे नाव देऊन आपली गुरु भक्ती भरत चामले यांनी दाखवून दिली आहे.
स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून कोणताही स्वार्थ न ठेवता केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून भरत चामले आणि त्यांच्या संचालक मंडळाने उत्कृष्ट निर्णय घेतले. विक्रीसाठी शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना कसलाही त्रास होणार नाही, याची स्वतः भरत चामले काळजी घेत होते.
आता पुन्हा खरेदी वक्री संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून
या निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप महायुतीच्या वतीने त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्यासोबत महायुतीच्या सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी पॅनल प्रमुख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवानदादा पाटील तळेगावकर, माजी आ. गोविंद अण्णा केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटूरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूलजी केंद्रे, चंद्रकांत अण्णा वैजापूरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रामराव बिरादार,किशनराव हरमुंजे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार म्हणून भरत चामले यांनी व अन्य सदस्यांनी निवडणूक अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस. नांदापूरकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघात विकास पुरुष माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या निवडणुका होणार असल्याने त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे.त्यामुळे सहकार क्षेत्रात होणाऱ्या या निवडणुका महायुतीला सोप्या जातील असे वाटते. भगवानराव पाटील तळेगावकर यांची साथ आणि भरत चामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे या निवडणुकीमध्ये निश्चितपणे महायुतीचे पारडे जड राहील असे बोलले जात आहे. अद्याप महाविकास आघाडी कडून या निवडणुकीच्या अनुषंगाने फारशी हालचाल दिसून येत नसली तरी विरोधासाठी विरोध म्हणून पॅनल उभा केला जाईल अशी चर्चा सहकार क्षेत्रामध्ये चालू आहे.
