आमिषाला बळी न पडता माझ्या कार्यकर्त्यांनी अशक्य वाटणारा विजय सत्यात उतरविला – आ. रमेशआप्पा कराड

0
आमिषाला बळी न पडता माझ्या कार्यकर्त्यांनी अशक्य वाटणारा विजय सत्यात उतरविला - आ. रमेशआप्पा कराड

लातूर (एल पी उगिले)
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात गेल्या वीस वर्षापासून संघर्ष करतोय, या संघर्षाला आजपर्यंत अनेकांनी साथ दिली, विधानसभा निवडणूकीत एका बाजूला काँग्रेसचा पाऊस पडत असताना मनाने श्रीमंत असलेले माझे गरीब कार्यकर्ते लढत होते. काँग्रेसच्या आमिषाला बळी पडले नाहीत. अशक्य वाटणारा विजय त्यांनी कष्टातून, मेहनतीतून सत्यात उतरविला. याचा मला सार्थ अभिमान आहे. माय माऊल्यांनी, मतदारांनी प्रचंड आशीर्वाद दिले, माझ्यावर विश्वास टाकला, हे ऋण कदापी विसरू शकत नाही. आमदारकीचा उपयोग मी स्वतःसाठी आजपर्यंत केला नाही आणि यापुढेही करणार नाही. केवळ तुमचे आशीर्वाद, प्रेम आणि साथ मला हवी आहे. असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आ. रमेश कराड यांनी केले.
लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीत मतदारानी एकाधिकार शाही, हुकूमशाही आणि धनशक्ती विरुद्ध आवाज उठून भाजपा महायुती चा ऐतिहासिक विजय केल्याच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधून जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी लातूर तालुक्यातील मौजे भातांगळी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत आ. रमेशआप्पा कराड बोलत होते. याप्रसंगी शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संपर्कप्रमुख ॲड. बळवंतराव जाधव, युवा नेते ऋषिकेशदादा कराड, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, ओबीसी मोर्चाचे भागवत सोट,पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, मंडल अध्यक्ष प्रताप पाटील, सुरज शिंदे, महिंद्र गोडभरले, शरद दरेकर, पांडुरंग बालवाड, विजय मलवाडे, गोविंद नरहरे, आदिनाथ मुळे, सुरेखा पुरी, मारुती शिंदे, राम बंडापल्ले, सुरेश पाटील, व्यंकट जटाळ, संजय ठाकूर, हनुमंत गव्हाणे, सतीश बिराजदार, लक्ष्मण नागिमे, रुपेश थोरमोठे यांच्यासह अनेकांची प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
या सभेत सरपंच संघटनेचे अध्यक्ष महादेव साळुंके यांच्यासह सलगरा, दगडवाडी, बोकनगाव, रमजानपूर येथील असंख्य कार्यकर्ते तसेच माजी सरपंच, चेअरमन व इतर लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. प्रारंभी भातांगळी ग्रामस्थांच्या वतीने वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आ. रमेश कराड यांच्यासह मान्यवरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सभेला भाजपा व महायुतीचे कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते‌.
यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. शेतकऱ्याचे दुःख काय असते? ते मी जवळून पाहिले आहे. शेतकऱ्यांना कष्टाचा, घामाचा मोबदला मिळावा. गोरगरीब सर्वसामान्याच्या हितासाठी या मतदार संघात गेल्या वीस वर्षापासून संघर्ष करीत राहिलो. माझ्या या संघर्षाला बहुसंख्य कार्यकर्त्यांनी वेळोवेळी साथ दिली. विधानसभा निवडणुकीत गावागावां तील, वाडी – वस्तीतील कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून, मेहनतीने, जिद्दीने निवडणूक जिंकली. अशक्य वाटणारा विजय सत्यात उतरविला. माय मावल्यांनी प्रचंड आशीर्वाद दिला, हे उपकार कधीही फेडू शकत नाही. असे सांगून मतदारासह सर्व सहकार्याचे अंतकरणापासून ऋण व्यक्त केले.
गेल्यावेळी भ्रष्ट पैशातून मतदारसंघ विकत घेण्याचे पाप काँग्रेसवाल्यांनी केले, मात्र देशात सर्वाधिक विक्रमी नोटाला मतदान झाले. याची दखल घेऊन पक्षाने मला आमदार केले. या आमदारकीचा उपयोग ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी केला. साडेतीन चार वर्षात मतदारसंघात तेराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. असंख्य मंदिराची जीर्णोद्धार करण्याचे भाग्य लाभले, मात्र पंधरा वर्षात काँग्रेस आमदारांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करून सर्वसामान्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आडवा आणि जिरवा हीच काँग्रेसची भूमिका होती. असे सांगून कारखान्यावर शेतकऱ्यांचा अधिकार असला पाहिजे, त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी या पुढील काळात संघर्ष करणार असून आपण सर्वांनी साथ द्यावी, असे आ. कराड यांनी बोलून दाखविले.
गेल्या पंधरा वर्षात काँग्रेसच्या काळात जे मिळाले नाही ते पाच वर्षात देण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली. माझ्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याने आजारी होतो. याबाबत देशमुखाची प्रामाणिकपणे चाकरी करणाऱ्यांनी नाही नाही ते उठवले, पोटनिवडणूक लागणार असे बोलले, उलट सुलट चर्चा केली, मात्र जोपर्यंत गोरगरीब जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत काहीही होणार नाही. असे सांगून भातांगळी गावासह परिसरातील विकासाला निधीची अडचण भासू देणार नाही. येणाऱ्या हनुमान जयंती पर्यंत डोमचा सभा मंडप पूर्ण करून देणार असेही आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
यावेळी बोलताना शिवसेना संपर्क प्रमुख ॲड. बळवंतराव जाधव म्हणाले की, निवडणुकीनंतर आभार मानून विकास कामे सांगा, असे म्हणणारे एकमेव आमदार रमेशआप्पा आहेत. आजपर्यंत काँग्रेसवाल्यांनी केवळ स्वतःच्या परिवारासाठी राजकारण केले. आजही सर्व कारखान्याचे चेअरमन देशमुखच केले. या कारखान्यावर अंकुश ठेवण्याचे काम रमेशआप्पांनी करावे, असे सांगून काँग्रेसच्या घराणेशाही राजकारणाला छेद देण्याचे काम रमेशआप्पा कराड यांनी केले असून आपले गाव सुधारले पाहिजे, विकसित झाले पाहिजे, या भूमिकेतून आणि मतदार बंधू भगिनींनीच्या विश्वासाला पात्र राहून काम करण्याची जबाबदारी आता कार्यकर्त्याची आहे, असेही सांगितले.
युवा नेते ऋषिकेशदादा कराड यावेळी बोलताना म्हणाले, लातूर ग्रामीण मधून भाजपचा आमदार होणार हे शक्य वाटत नव्हते, मात्र रमेशआप्पांची नाळ सर्वसामान्य जनतेसोबत जोडली असल्याने मतदारांनीच यावेळी आप्पांना आमदार करण्याचा निर्णय घेतला होता. मतदारांनी प्रचंड आशीर्वाद दिले, माझ्या कातडीची जोडे करून मतदारांच्या पायात घातले तरी त्यांनी कराड परिवारावर दाखवलेल्या विश्वासाचा उपकार फिटणार नाहीत. असे सांगून या कर्मभूमीचा, जन्मभूमी चा मी काहीतरी देणे लागतो, या भावनेतून रमेशआप्पा काम करीत आहेत. जोपर्यंत मतदार संघातील प्रत्येक गाव विकसित होणार नाही, तोपर्यंत म्हणजे येणारे पंधरा वर्ष रमेशआप्पा कायम आमदार रहावेत या भूमिकेतून आपण सर्वजण काम करू. अधिका अधिक निधी खेचून आणू या. असे बोलून दाखवले. या सभेत प्रताप पाटील, पांडुरंग बालवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी व्यंकट जटाळ यांनी प्रास्ताविक केले तर शेवटी आदिनाथ मुळे यांनी आभार मानले. सभेचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.
यावेळी राम बंडापल्ले, लिंबराज बोळंगे, चंद्रकांत पासमे, सचिन साबदे, रुपेश काळे, अशोक बिराजदार, लक्ष्मण मुळे, पुंडलिक बेंबडे, संजय सावंत, यादवराव पाटील, अहमद शेख, संजय मुर्गे, कमलाकर बाचपले, बालाजी पांचाळ, संजय सावंत, सोमनाथ वाघमारे, दिलीप मुक्ता, दुष्यंत शिंदे, अक्षय पाटील, विशाल पाटील, गणेश बोबडे, हनुमंत भोसले, सुभाष भोळे, भागवत गावित, पांडुरंग शिंदे, धनंजय शिंदे, आत्माराम यादव, विष्णू कारवाडे, बालाजी सुरवसे, बाबासाहेब इंगळे, संभाजी वाकडे, पद्माकर शिंदे यांच्यासह भाजपा महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!