विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी दिलीपराव देशमुख

0
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी दिलीपराव देशमुख

लातूर (एल.पी.उगिले) महाराष्ट्रातील ख्यातकीर्त असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नंतर कार्यकारी मंडळाची निवडणूक देखील
बिनविरोध झाली. या बैठकीत कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री, मांजरा परिवाराचे आधारवड, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांची बिनविरोध फेरनिवड तर उपाध्यक्ष म्हणून अशोकराव काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या वतीने यावेळी, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करून अभिनंदन केले. आगामी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या कारखान्याने लातूर आणि परिसरात आर्थिक परिवर्तन घडवले आहे, मांजरा परिवाराचा आता मोठा विस्तार झाला आहे, परिवारातील इतर साखर कारखाने तसेच मराठवाडा व राज्यातील इतर अनेक साखर कारखान्यांनी या परिवाराच्या व्यवस्थापनाचे अनुकरण करून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्या जीवनात चांगले दिवस आणले आहेत. त्यामुळे या सर्वच साखर कारखान्याची मातृसंस्था म्हणून आज विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्या कडे पाहिले जात आहे. भविष्यकाळातही मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्याची वाटचाल अनुकरणीय आणि प्रेरणादायी राहील हा विश्वास आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचे याप्रसंगी स्वागत आणि सत्कारही विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!