अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शामसुंदर मानधना
लातूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी शामसुंदर मानधना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याचे काम अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने केले जाते.पंचायतीच्या वतीने सुचवलेल्या सदस्यांची ग्राहक संरक्षण परिषदेवर नियुक्ती केली जाते.या चळवळीत मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या शामसुंदर मानधना यांचे काम पाहून जिल्हाध्यक्ष ॲड. महेश ढवळे यांनी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. विद्युत तक्रार निवारण न्याय मंचचे सदस्य अजय भोसरेकर, जिल्हाध्यक्ष ॲड.महेश ढवळे, जिल्हा संघटक दत्तात्रय मिरकले यांच्या हस्ते मानधना यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल प्रा.एन.जी. माळी, प्रा.माधव गुंडरे, बळवंत कागले, माधव भांडे,सुरेखा स्वामी,इस्माईल शेख, तालुकाध्यक्ष ॲड.संगमेश्वर रासुरे, तालुका संघटक धनराज जाधव, शारदा बेद्रे, मुन्ना हाश्मी, गोविंद राठोड, सुरेखा स्वामी यांनी मानधना यांचे अभिनंदन केले आहे.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सचिव अरूण देशपांडे यांनीही मानधना यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.