गणेशोत्सवामध्ये मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी

गणेशोत्सवामध्ये मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी

देवणी (प्रतिनिधी) : येथे सावरगाव राजमुद्रा प्रतिष्ठान तर्फे आयोजित मधुमेहाची व रक्तदाबाची चाचणी करण्यात आली . यावेळी गणेश उत्सवानिमित्त सावरगाव येथे राजमुद्रा प्रतिष्ठान व मधुर डायबेटीस सुपरस्पेशालिटी सेंटर यांच्या तर्फे मोफत मधुमेहाची व रक्तदाबाची चाचणी करण्यात आली. यावेळी टीमप्रमुख म्हणून डाॅ. प्रशांत नवटके तर त्याचे सहकारी लक्ष्मन सावंत सर जयप्रकाश जाधव, विलास सोनाळे, रूपेश भुईनर उपस्थित होते.राजमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने सर्वाचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी राजमुद्रा प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्तेयांनी विशेष मेहनत घेतली त्यांना गावातील जेष्ठाचे मार्गदर्शन व समाज सेवकाचे सहकार्य लाभले. गावामध्ये खूप दिवस झाले असे आरोग्यदायी शिबीर झाले नव्हते, यामुळे वयस्कर लोकांमध्ये व मधुमेही आणि रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी 122 जणांची रक्ताची तपासणी करण्यात आली यामध्ये 17 जण मधुमेही तर 31 जण रक्तदाबाचे रुग्ण आढळून आली.

About The Author