उदगीर (एल पी उगीले )
उदगीर येथील डॉ. सुदाम बिरादार यांनी अल्पावधीत लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. उच्च विद्या विभूषित असलेल्या डॉ. सुदाम बिरादार यांनी यापूर्वी भिलाई येथील जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील एस एन सी चित्रकूट या ठिकाणाहून त्यांनी फेलोशिप पूर्ण केली.
राजस्थान मधील पाली सेवा मंडळ नेत्र रुग्णालय पाली येथे दोन वर्षाहून अधिक काळ सेवा बजावली. जिथे त्यांना सर्वोत्तम डॉक्टर म्हणून गौरविण्यात आले. वेगवेगळ्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 2022 ते 2025 या कालावधीमध्ये उदगीर येथील उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय येथे मुख्य नेत्रातज्ञ म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये 16 हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे एका दिवसात शंभरहून अधिक शस्त्रक्रिया करण्याचा त्यांचा विक्रम अनेक वेळा गाजलेला आहे.
जवळपास 25 हजाराहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी पूर्ण केल्या आहेत. टोरिक, ट्रायफोकल, ईडाॅफ, मल्टीफोकल, आणि ॲडव्हान्स मोनोफोकल यासारख्या सर्व प्रीमियम लेंस शस्त्रक्रियांचा समृद्ध अनुभव डॉ. सुदाम बिरादार यांना आहे.
त्यांच्या उदगीर येथील नेत्र रुग्णालया मध्ये कॉम्प्युटर द्वारे संपूर्ण नेत्र तपासणी केली जाते, तसेच फेको मशीनद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. सर्व प्रकारच्या पोर्टेबल लेन्स सुद्धा उपलब्ध आहेत. बिना टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रियाही केली जाते. डोळ्यातील मांस वाढले असेल तर त्याचीही शस्त्रक्रिया या ठिकाणी केली जाते. त्यासोबतच काचबिंदू वर उपचार व शस्त्रक्रिया केले जाते. मधुमेह असलेल्या रुग्णांच्या डोळ्याच्या मागील पडद्याची तपासणीही केली जाते. नासूर तपासणी आणि त्यावर उपचार केला जातो. तिरळेपणा तपासणी व उपचार केला जातो. डोळ्याच्या कोरडेपणाची तपासणी व उपचार केला जातो. कॉन्टॅक्ट लेन्स बसवण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. पापणी वरील गाठींची शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते.
अशा अत्यंत अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह उभ्या असलेल्या या दवाखान्यामध्ये गोरगरिबांची देखील दखल घेऊन त्यांना सहकार्य केले जाते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पैसे कमावण्याच्या उद्देशाने मोठमोठ्या शहरात जाण्याचा ओढा अनेकांना असला तरी डॉ. सुदाम बिरादार यांनी आपल्या भागात आपल्या गावाकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुविधा पुरविणारी एक यंत्रणा उभी करावी, या सामाजिक भावनेतून उदगीर शहरातून सेवा द्यायला सुरुवात केली आहे. वैद्यकीय सेवा देत असतानाच ग्रामीण भागातील लोकांना देखील आपल्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे. अशा उदात्त हेतूने त्यांनी विविध शिबिरांचे आयोजन करायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात तर शिबिरे आहेतच आहेत, आता कर्नाटकातील घाटबोरोळ या ठिकाणी देखील त्यांचे नुकतेच शिबिर यशस्वी झाले. या शिबिरामध्ये 380 नेत्र रुग्णांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. त्यापैकी 92 नेत्र रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया लवकरच अल्प दरात केल्या जाणार आहेत.
हूमनाबाद तालुक्यातील घाटबोरोळ येथील या शिबिराच्या उद्घाटन समयी प्रकाशराव पाटील, संभाजीराव पाटील, भाऊराव पाटील, किसन नाईक, डॉ. शिवकुमार गणेश, गंभीरराव गुरुजी, राजू पाटील, नरसिंग पाटील, हनुमंतराव बिरादार, ज्ञानोबा कोंगळे, दत्ता बिरादार, अनंत बिरादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी बिरादार नेत्र रुग्णालय व फेको सेंटरच्या टीम मधील डॉ. सुदाम बिरादार, मंजोबा बिरादार, गणेश जोगदंड, कृष्णा बिरादार, संजय पांडेकर, सिद्धेश्वर पांढरे इत्यादीनी मेहनत घेऊन शिबीर यशस्वी केले. या प्रसंगी अल्प दरामध्ये चष्मे वाटप करण्यात आले. तसेच अनेकांना मोफत औषधी वाटप करण्यात आले. या शिबिराचा लाभ ग्रामीण भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात घेऊन डॉ. बिरादार नेत्र रुग्णालय व फेको सेंटरला धन्यवाद दिले आहेत. अशाच पद्धतीचे शिबिर ठिकठिकाणी आयोजित करून सामाजिक जाणीवा जपत लोकांचे हित जोपासावे. अशी मागणी आता लोकांमधून होऊ लागली आहे.














Responses (0 )