उदगीर येथील गोल्डन गेट पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या भक्तीमय व उत्साही वातावरणात संपन्न

Written by

in

उदगीर (प्रतिनिधी):

येथील प्रसिद्ध शिक्षण संस्था ‘मातृभूमी विद्या संकुल’ द्वारा संचलित ‘गोल्डन गेट पब्लिक स्कूल’मध्ये भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव अतिशय भव्य, उत्साही आणि भक्तीमय वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बालकृष्ण आणि राधाराणी यांची अत्यंत मनमोहक व नयनरम्य वेशभूषा साकारून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. श्रीकृष्ण जन्माचे आणि दहीहंडी या पारंपरिक उत्सवाचे भारतीय संस्कृतीमधील महत्त्व तसेच त्याचे सामाजिक मोल काय आहे, हे शिक्षकांनी सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी भक्तिगीते, नृत्ये व विविध कलागुणांचे सादरीकरण करत संपूर्ण कार्यक्रमात रंग भरला.

शाळेतील गोविंद पथकाने मानवी मनोरे रचून सहभाग नोंदवला. यावेळी ‘गोविंदा आला रे आला’ आणि ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की’ या जयघोषाने, टाळ्यांच्या गजर आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला होता.

केवळ मनोरंजनापुरता हा सोहळा मर्यादित न ठेवता, दहीहंडीच्या या क्रीडाप्रकाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, आपापसातील एकता, शिस्तबद्धता, धैर्य, नेतृत्वगुण आणि परस्परांना सहकार्य करण्याची वृत्ती यांसारख्या मूल्यांची रुजवण व्हावी, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. शेवटी सर्व गोविंदांनी अत्यंत उत्साहात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून या उत्सवाचा आनंद द्विगुणीत केला.

हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ. दीपिका बिरादार आणि ऍडमिन सौ. स्वाती भांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी अश्विनी कडोळे, प्रणिता डिगोळे, प्रज्ञा माने, अर्चना चव्हाण, नेहा आचर्या, चंदा पेंढारकर, शिल्पा पवार, माधवी शिनगारे, मानसी पाटील, नंदा चाफेकरंडे,नीता गुंडरे आणि रत्नदीप मादळे व कुशाल बिरादार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदाची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांचे सांघिक नियोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व अतिशय आनंददायी सहभाग यामुळे हा दहीहंडी उत्सव अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *