उसाच्या शेतात गांजाची लागवड, ४ लाख ३१ हजारांचा ८ किलो ६२० ग्रॅम गांजा जप्त.

Written by

in

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अंमली पदार्थांची अवैध लागवड, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या अनुषंगाने शिरूर अनंतपाळ पोलिसांनी कारवाई करून उसाच्या शेतात लागवड केलेला गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ८ किलो ६२० ग्रॅम गांजा, अंदाजे ४ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.२८ वाजण्याच्या सुमारास मौजे सांगवी-घुगी येथील शेतशिवारातील सर्वे क्रमांक १२ मधील मधुकर बिरादार यांच्या उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची बाब निदर्शनास आली. याप्रकरणी आरोपी

मनोज मधुकर बिरादार, (वय ३८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. सांगवी-घुगी, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सदर ठिकाणाहून गांजाची झाडे उपटून दोन पोत्यांमध्ये भरलेला एकूण ८ किलो ६२० ग्रॅम गांजा मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ४ लाख ३१ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३३/२०२६, कलम ८(क), २०(ब)(ii)(ब), एनडीपीएस अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची फिर्याद परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अक्षय जाधव यांनी दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायबोळे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी अक्षय जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने केली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *