नागराळ येथील विघ्नहर्ता बाल गणेश मंडळाचा पोलीस उप महानिरीक्षकाच्या हस्ते सन्मान

Written by

in

देवणी (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे नागराळ येथील बाल गणेश मंडळाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलीे. या मंडळातर्फे विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आलेल्या मध्ये प्राधान्याने रक्तदान शिबिर, रक्तदात्यांना मोफत हेल्मेट वाटप,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सोबतच प्रोत्साहन पर ट्रॉफी वाटप तसेच या गणेश मंडळांनी सामाजिक जाणीव जपत पारंपारिक वाद्याचा वापर करून शांततापूर्वक विसर्जन केल्याबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप , जिल्हा पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष सुमित भास्कर चामले व मंडळाचे पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे युवा नेते रतन पाटील नागराळकर, रामेश्वर बिरादार नागराळकर, धनराज पाटील, राजकुमार यलमटे यांच्यासह विविध गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *