भादा खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा.

Written by

in

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील पोलीस ठाणे भादा येथे दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, लातूरने अत्यंत चिकाटीने समांतर तपास करून उलगडा केला आहे. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून त्यातून मिळालेल्या लहान-सहान धाग्यादोऱ्यांची सांगड घालण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून २० हजार ५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २१०/२०२६, कलम १०३(२), २३८ भारतीय न्याय संहिता अन्वये खुनाचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची मोठ्या प्रमाणावर पडताळणी करण्यात आली. या फुटेजमधून मिळालेल्या लहान-सहान धाग्यादोऱ्यांचा सखोल अभ्यास करून तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. उपलब्ध माहितीची पडताळणी करत पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने व त्यांचे पथक औसा ते तुळजापूर मार्गावरील अशिव टोल नाका परिसरात असताना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर मोड, औसा येथील टी-पॉईंट चौकात संबंधित आरोपी थांबलेला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे दुपारी सुमारे २.३० वाजता संबंधित इसमास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव सिद्धार्थ महादेव निकम, (वय १८ वर्षे १ महिना, रा. शेरे, ता. कराड, जि. सातारा) असे सांगितले.

सदर गुन्ह्याबाबत आरोपीकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, मित्र ओमकार राठोड याच्याकडील पैशांच्या कारणावरून त्याचा खून केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती तपास पथकाने दिली. तसेच मृत व्यक्तीजवळून घेतलेल्या पैशांपैकी उर्वरित रक्कम स्वतःकडे असल्याचेही त्याने सांगितले.

त्यानंतर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ट्रॅकपॅन्टच्या डाव्या खिशात ५०० रुपयांच्या ४१ नोटा, एकूण २० हजार ५०० रुपये रोख रक्कम मिळून आली. सदर नोटांवर रक्तासारखे डाग दिसून आल्याचे पोलिसांनी पंचांसमक्ष ही रक्कम जप्त केली.आरोपी सिद्धार्थ महादेव निकम याला जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे भादा येथे हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजची व्यापक पडताळणी, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध धाग्यादोऱ्यांची सांगड घालत गुन्ह्याचा समांतर तपास केला.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे, सहाय्यक फौजदार सर्जेराव जगताप,पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, रामलिंग शिंदे, युवराज गिरी, राजेश कंचे, जमीर शेख, राहुल कांबळे, प्रेम राठोड, गणेश साठे, संजय कांबळे, पाराजी पुठ्ठेवाड,अर्जुन राजपूत, विनोद चलवाड , शैलेश सुडे, रामदास बाचीफळे, हरी पतंगे, संतोष खांडेकर, श्रीनिवास जांभळे, बंडू नीटुरे, चंद्रकांत केंद्रे, काकासाहेब बोचरे यांनी केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, लातूरच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची सूक्ष्म पडताळणी, तांत्रिक विश्लेषण आणि चिकाटीपूर्ण तपासाच्या आधारे केलेली ही कारवाई गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *