लातूर जिल्हा बँक उस तोडणी यंत्रासाठी १०० कोटी रुपये थेट कर्ज देणार
लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील अग्रगण्य असणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस तोड यंत्रासाठी शेतकऱ्यांना तब्बल १०० कोटी रुपये थेट कर्ज वाटप करण्याचा निर्णय लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित कर्ज समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वेळोवेळी शेतकरी हा केंद्र बिंदू समोर ठेवून शेतकर्याना पतपुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले असून जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या शिफारशी नुसार सदरील कर्ज वसुलीच्या हमिवर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उस तोडणी यंत्र खरेदी करता कर्ज वाटपाचा निर्णय घेन्यात आला आहे सदरील कर्ज वितरणासाठी शेतकरी सभा सदाकडील स्थावर/ जंगम मालमत्तेचे गहाण खत करून देणे आवश्यक असून ७ वर्ष परतफेडीच्या मुदतीने १० % व्याज दराप्रमाणे कर्ज वितरण करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकरी सभासदांनी उस यंत्र तोडणी यंत्र कर्जा संदर्भात जिल्हा बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख, व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव, कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले आहे.