आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

मनोगत
गुन्हेगारी जगताचा मागोवा घेणारे एक आदर्श मानदंड असलेले साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूज गेली सहा वर्ष वृत्तपत्र सृष्टीत संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात लोकप्रिय आहे. आमच्यावर अनेकांनी प्रेम दाखवले, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो ….. तसेच काहीजणांनी आमच्यावर रोषही दाखविला कारण आम्ही परखड आणि निर्भीड पणाची पत्रकारिता दाखवून दिली. समाजहिताच्या आड येणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. लाचखोर आणि समाजाचे शोषण करणारे अधिकारी, कर्मचारी यांनी लाचखोरी केली आणि लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहात पकडल्यानंतर ही प्रवृत्ती संपावी या सद्भावनेने आम्ही परखड लिखाण केले. मूठभरांचा विरोध असला तरी समाजातील बहुतांश वाचक आमच्या पाठीशी आहेत. आमच्या पत्रकारितेचे कौतुक महाराष्ट्र पत्रकार संघाने सतत सहा वेळेस राज्यस्तरावरील पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्याचबरोबर जिल्हा पत्रकार संघाने सलग पाच वर्ष उत्कृष्ट अग्रलेख, उत्कृष्ट दिवाळी अंक, संपादक रत्न, पत्रकार रत्न पुरस्काराने सन्मानित केले. यावरूनच आमचा दर्जा काय आहे, हे वाचकांना समजते. ‘भ्रष्टाचाराला लाथ’, ‘सज्जन प्रवृत्तीला साथ’ अशा भूमिकेतून आम्ही लिखाण केले आहे. त्याच विश्वासाने आम्ही काम करत आहोत. सा. पोलीस फ्लॅश न्यूजने आत्तापर्यंत स्त्रीभ्रूणहत्या थांबवावी ; महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, जलजागृती अशा एक ना अनेक विषय घेऊन लोकप्रबोधनाची मशाल पेटवली आहे. तसेच क्राईम जगतात काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी क्राईम रिपोर्टर असोसिएशन नावाची संस्था स्थापन केलेली आहे. या समूहामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांना संधी दिलेली आहे. तसेच या स्पर्धेच्या युगात वाचकांना देशात घडत असलेल्या घडामोडी तात्काळ जाणून घेण्यासाठी पोलीस फ्लॅश न्यूज नावानेच वेब न्यूज पोर्टल सुरु करत आहोत. आम्ही संगणक युगाच्या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देऊ. समाजामध्ये चालत असलेल्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीची माहिती पोहचविण्याचे काम वेब न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. ते आपणास नक्कीच आवडेल यात आम्हाला शंका नाही.

धन्यवाद !
आपला स्नेहांकित
गणेश डी. होळे
मुख्य संपादक

You may have missed