चॉकलेटचे आमिष दाखवून ५ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या ६० वर्षीय नराधमास ३ वर्षे कारावास.
लातूर (एल पी उगीले) चॉकलेटचे आम्हीच दाखवून पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धास न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये कायद्याचा वचक अधोरेखित करणारा निकाल लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनीनवरे येथे ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६० वर्षीय आरोपीला न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ११ जून २०२३ रोजी किनीनवरे (ता. औसा) येथे घटना घडली होती. आरोपी विठ्ठल शिवाजी शिंदे (वय ६०, रा. किनीनवरे) याने फिर्यादी यांच्या ५ वर्षीय मुलीला किराणा दुकानातून चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन गावातील शाळेच्या पाठीमागे नेले व तिथे तिच्यावर लैंगिक हमला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रशांतसिंह राजपूत यांनी तातडीने तपास चक्र फिरवून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले, आणि माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावीपणे बाजू मांडली.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच आणि तपास अंमलदार यांची साक्ष या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची ठरली.
सदर प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सरकारी पंच व तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची झालेने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुण मा. जिल्हा व सत्र न्यायालय 4 एस व्ही जाधव यांनी या प्रकरणामधील आरोपी विठठल शिवाजी शिंदे (वय 60 रा किनीनवरे ता औसा जि लातूर) यास 5 मार्च रोजी कलम 354 (ब), भादवि सह कलम 8,12 अन्वये बालकाचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम 2012 अन्वये 3 वर्षे कारावास आणि 3000/- रु दंड अशी शिक्षा सुनावली आहे
सदर खटल्याचे कामकाजाचे यशस्वीतेकामी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली ट्रायल मानिटरींग सेल चे सपोनि एस. व्ही. मनाळे, पोलीस अंमलदार पंढरीनाथ सोमवंशी यांनी काम पाहिले आहे.
