बी.एस्सी. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

0
बी.एस्सी. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

उदगीर : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बी.एस्सी. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून श्री हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर येथील वाणिज्य विभागाच्या डॉ. सुचिता धनुरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. राहुल आलापुरे यांनी करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गौरवी बिरादार आणि सय्यद साफिया रशीद अली यांनी केले.
प्रमुख पाहुण्या डॉ. सुचिता धनुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून संवाद कौशल्य, नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास, वेळेचे व्यवस्थापन आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती या कौशल्यांचा विकास आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून समाजात सकारात्मक योगदान द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य मस्के यांनी विद्यार्थ्यांना सांगितले तुम्ही केलेल्या कार्यावरच तुमची ओळख निर्माण होईल. यावेळी बी.एस्सी. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी प्रा. डॉ. जे. एम. पटवारी, प्रा. डॉ. व्ही. एस. नागपुर्णे, प्रा. डॉ. बी. एस. कांबळे, प्रा. डॉ. पी. एस. शेटे, प्रा. डॉ. शैलेश ममदापूरे, प्रा. डॉ. सबीना शेख, प्रा. मुस्कान मणियार, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर, प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे, प्रा. डॉ. एस. एम. सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप श्री. हर्षद कांबळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!