शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उदगीर येथे उत्साहात ध्वजारोहण, दुग्धाभिषेक व शिववंदना
उदगीर (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे मोठ्या उत्साहात ध्वजारोहण, दुग्धाभिषेक, प्रतिमा पूजन, जिजाऊ वंदना व सार्वजनिक अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अमोल पाटील कोळखेडकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उदगीर-जळकोट मतदारसंघाचे आ. तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच सुनीलजी सावळे यांच्या शुभहस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व शिवप्रेमी बांधवांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. “जय जिजाऊ… जय शिवराय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” तसेच विविध शिवगर्जनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिवभक्तांच्या उत्स्फूर्त घोषणांमुळे वातावरण शिवमय झाले होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि लोककल्याणकारी विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
या प्रसंगी आ. संजय बनसोडे, ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, दिलीप मटके, उमेश उमापुरे, बाळासाहेब पाटोदे, अमोल पाटील कोळखेडकर, धनाजी मुळे, सुनील सावळे, मनोज पुदाले, अमोल अनकले, बिपीन पाटील, अजीम दायमी, अनिल इंगोले (देवणी), बालाजी भोसले, विकी भोसले, नीता मोरे, प्रशांत जगताप, धनंजय गुरसुरकर, विठ्ठल जाधव (कोदळी), सिद्धेश्वर लांडगे, कृष्णा पाटील (धोंडीपुरगेकर), श्रीनिवास एकुकेकर, प्रसाद पाटील (लासोना), अमोल धुमाळे, रवी मुळे, चंद्रकांत टेंगेटोल, मदन पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, गोपाळ पाटील, महेश बिरादार. सय्यद इरफान, भानुदास कबनुरे, डी.एस. बिरादार, राहुल अतनुरे,राहुल पाटील, संदीप पाटील, बाबासाहेब पाटील, गिरीधर पाटील (जिंकलवाड), वैजनाथ नारायण भोसले, ज्ञानेश्वर दापकेकर, संतोष पाटील (गंगनबीड), व्यंकट बोईनवाड, अॅड. विकेत शिवाजी बिरादार, संतोष वळसे, सद्दाम बागवान, सतीश पाटील (मानकीकर), गणेश मुंडकर, अंकुश ताटपले, विकी सूर्यवंशी, बाळू बिरादार, विठ्ठल मोरे, भाऊसाहेब जांभळे, पंकज कालाणी, बालाजी नादरगे, तोंडारे साई, पवन बिरादार (होनाळी),शिवाजी पाटील प्रताप बिरादार, बालाजी येंकोने,प्रीतम वीरशेटे अदनान जादूगर, अभि माने,आदित्य बिरादार कल्लूर,प्रसाद पांढरे, दत्ता गोरे,गणेश बिरादार, संतोष राठोड,अजय जाधव, मुदाळे ,सार्थक केंद्रे, इसूबा, यांच्यासह उदगीर शहर व परिसरातील असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रेमी युवकांच्या वतीने करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य, स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि सुशासनाचा प्रेरणादायी दिवस असून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिवमय वातावरणात संपन्न झाला.
