आपण सारे एक असे रूपांतर होण्यासाठी रक्तदान काळाची गरज – डी वाय एस पी अरविंद रायबोले
लातूर (एल पी उगीले) सध्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस ताणतणावात जगतो आहे. त्यामुळे धावपळ सुरू आहे. या धावपळीत पावलोपावली अपघात होऊ लागले आहेत. अशा अपघाताच्या वेळी अपघातग्रस्तांना रक्ताची अत्यंत गरज असते. मात्र रक्त हे कृत्रिम बनवता येत नसल्यामुळे रक्तदात्यांनी दिलेल्या रक्त साठ्याच्या आधारावरच त्यांचे जीवन उभा राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून रक्तदान चळवळ आणि रक्तदात्यांना दुचाकीवरून जात असताना एक हेल्मेट एक जीवनदान अशी संकल्पना राबवून जिल्हाभरात एक नवीन चळवळ सुरू केली आहे.
रक्तदानामुळे मी हा जो स्वार्थ असतो, त्या स्वार्थाला आम्ही हे स्वरूप येते. कारण माझे रक्त अनेकांच्या शरीरात गेलेले असते, किंवा कुणीतरी अज्ञात व्यक्तीचे रक्त माझ्या शरीरात आलेले असते, कारण हे आता रक्तदाते आणि रक्त घेणारे यांच्यामध्ये रक्ताचे नाते निर्माण होते. आपण सारे भाऊ भाऊ ही भावना राष्ट्रीय भावना निर्माण करायला कारणीभूत ठरू शकते. असा आदर्श विचार अहमदपूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांनी जळकोट येथील पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विचार व्यक्त केले.
जळकोट सारख्या ग्रामीण भागात खेड्यापाड्यातून पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावागावातून तरुणांनी रक्तदानासाठी जळकोट मध्ये मोठी गर्दी केली होती. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करून राष्ट्रीय कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले यांनी कौतुक केले आहे. या रक्तदान शिबिराच्या वेळी,
जळकोटचे पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड,आणि जळकोट तालुक्यातील कर्तबगार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लबच्या मदतीने सुरू केलेल्या रक्तदान शिबिराच्या मोहिमेमध्ये जळकोट पोलीस स्टेशन येथे अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या पुढाकाराने उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. त्या रक्तदात्यांना डॉक्टर भालचंद्र ब्लड सेंटर लातूर यांच्या वतीने रक्तदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने या रक्तदात्यांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. दुचाकी वर चालत असताना एक हेल्मेट एक जीवदान अशा पद्धतीचा संदेश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिला आहे. त्याचा तंतोतंत वापर व्हावा, या आदर्श उद्देशाने आणि लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दुचाकीवरून चालत जात असताना हेल्मेटचा वापर करावा, असा संदेश या रक्तदान शिबिरातून देण्यात आला. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांनी रक्तदान शिबिराचे महत्व विशद केले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आणि मोठे दान मानले जाते, कारण मानवी जीवनात रक्ताला कोणत्याही प्रयोगशाळेत किंवा कृत्रिम पद्धतीने तयार करता येत नाही. अपघात, गंभीर शस्त्रक्रिया, कर्करोग किंवा थॅलेसीमी यासारख्या आजाराने ग्रस्त रुग्णासाठी रक्त संकलन अत्यंत महत्त्वाचे असते. एका रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचू शकतात. अपघात असेल, पुरस्थिती दरम्यान मोठ्या शस्त्रक्रियेच्या वेळी रक्ताच्या गरज पडली असेल अशावेळी रक्तदानामुळे जीवनदान मिळू शकते. तसेच कोणते मोठे अपघातामध्ये झालेला रक्तस्त्राव भरून काढण्यासाठी रक्तदानाची फार मोठी गरज आहे. सध्या रक्तदात्यांची संख्या कमी असल्यामुळे आणि अपघाताची संख्या वाढल्यामुळे रक्तदात्यांनी जास्तीत जास्त रक्तदान केले तर राष्ट्रीय संकट आपण मैत्रीतून पूर्ण करू शकतो. रक्तदानातून आपण रक्ताचे नाते निर्माण करतो असा आदर्श विचार अहमदपूर उपविभागाचे पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी व्यक्त केले.
रक्तदानामुळे नवीन पेशींची गतीने निर्मिती होते, रक्तदान केल्यामुळे शरीरातील अस्थी मज्जा नवीन रक्त तयार करण्यासाठी उत्तेजित होते. त्यामुळे शरीराला ताजेपणा येतो, एकावेळी रक्तदान केल्याने शरीरात अनेक कॅलरी खर्च होतात, मात्र त्याच्या अगेन्आस्ट ऊर्जा मिळते. कोणत्याही वयोगटातील तंदुरुस्त व्यक्ती ज्यांनी यापूर्वी रक्तदान केलेले आहे असे रक्तदाते रक्तदान करू शकतात. मात्र रक्तदाते हे कोणत्या संसर्गजन्य रोगाने पीडित असू नयेत, अशी माहिती त्यांनी दिली.
जळकोट येथील पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 161 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करून पोलीस आणि जनता यांचे नाते जवळचे असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.
जनतेने पोलिसांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देऊन जळकोट सारख्या छोट्या तालुक्यातून 161 रक्तदात्यांनी रक्तदान करून जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या आवाहनाला साथ दिली. याबद्दलही उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी रक्तदात्यांचे आणि या रक्तदान शिबिराच्या संयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
