नगरपालिकेच्या घंटागाड्या पूर्वत सुरू कराव्यात – युवक काँग्रेसची मागणी
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील घंटागाडी गेल्या अकरा दिवसापासून बंद असल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेऊन तात्काळ घंटागाड्या सुरू कराव्यात. अशा पद्धतीची मागणी करणारे निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांना देण्यात आले.
सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने दिनांक 26 सप्टेंबर 2022 पासून पालिकेच्या हद्दीतील नागरिकांना नाईलाजास्तव गल्लोगल्ली किंवा रस्त्यावर कचरा टाकावा लागत आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी दुर्गंध ही पसरला आहे. यामुळे रोगराई पसरू शकते, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी घंटागाडी तात्काळ सुरू कराव्यात अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करावे लागेल. असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस फैयाज मोहम्मद डांगे यांच्या वतीने देण्यात आला आहे.
सदरील निवेदनावर माजी नगरसेवक नागेश अष्टुरे, श्रीनिवास एकुरगेकर, आशिष चंदिले, शिवाजी पकोले, सद्दाम बागवान, प्रेम गायकवाड, प्रकाश गायकवाड इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागरिकांचे आरोग्य विचारात घेऊन स्वच्छतेसाठी नामांकित असलेल्या या नगर परिषदेने घंटागाडी पूर्वत सुरू करावी. अशी मागणी जनतेतून होत आहे.