अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात रमले रुईच्या जि.प. शाळेचे विद्यार्थी

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात रमले रुईच्या जि.प. शाळेचे विद्यार्थी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात दिनांक ११ व १२ मार्च रोजी संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा दक्षिण रुई येथील जि. प. शाळेचे विद्यार्थी अगदी बाल वयातच महाविद्यालयीन स्नेहसंमेलनात तब्बल आठ तास रमून मनमुराद मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आस्वाद घेत सहभागही नोदवला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ललित साहित्यकार तथा ज्येष्ठ समीक्षक महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण रुई येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीचे आयोजन महात्मा फुले महाविद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड, सतीश हरगले व कोटापल्ले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे महात्मा फुले महाविद्यालयात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी तथा एन. एस. एस. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी महाविद्यालयाचा परिसर तसेच, विविध विभागांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच पुढील सत्रात विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कोडी आणि वक्तृत्वाने तसेच स्वलिखित काव्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तसेच उपस्थित सर्व स्त्रोतांची मने जिंकली. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा तसेच संगीत व साध्या शेला पागोट्याचा आनंद घेतला. महाविद्यालयीन जीवन काय असते ? मोकळेपणा कसा असतो? मैत्री काय असते? प्राध्यापक कसे असतात? मुले मुली एकमेकांशी कसे वागतात? यासह इतर बाबींचा अनुभव प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बालवयातच घेतला तसेच कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी व शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षकवृंदानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे आभार मानले.

About The Author