मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्ल्याचा देवणीत निषेध

मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्ल्याचा देवणीत निषेध

देवणी (प्रतिनिधी) : अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यासह अन्य मागण्यासाठी ग्रामस्थ उपोषणाला बसले होते, उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यासाठी होकार दर्शविला होता अचानक धरपकड झाल्याने जमाव आक्रमक झाला पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठी मार व हवेत गोळीबार केला यावेळी हिंसक वळण लावल्याने अनेक आंदोलक जखमी झाले आहेत या प्रकरणाचा शनिवार रोजी बोरोळ चौकात निषेध करून मराठा समाज बांधवाकडून देवणी तहसीलचे पेशकार साळुंखे यांना निवेदन दिले.

या निवेदनावर शंकर पाटील, अनिल इंगोले, किशोर निडवंचे, बाबुराव इंगोले, मनसेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ कलशेट्टी, रमेश कोतवाल,धनराज बिरादार, सुभाष पाटील, बालाजी वळसांगवीकर, शुभम पाटील, अंकुश माने, कृष्णा इंगोले, अमित मानकरी, मनोहर पाटील, अजिंक्य कारभारी,जावेद तांबोळी, रमेश गायकवाड, लक्ष्मण रणदिवे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता, व तसेच मराठा समाज बांधवांच्या वतीने सोमवार रोजी देवणी बाजारपेठ बंद ठेवणार असल्याचे सांगणयात आले आहे.

About The Author