श्री हावगीस्वामीत राज्यशास्त्र विभागाच्यावतीने वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Written by

in

उदगीर (प्रतिनिधी)

श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बी.ए. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित आपले मत प्रभावीपणे मांडले.

महात्मा गांधी यांनी पाहिलेल्या भारताच्या स्वप्नात सत्य, अहिंसा, सामाजिक समता, सर्वधर्मसमभाव, ग्रामस्वराज्य, स्वावलंबन आणि सामाजिक न्याय या मूल्यांना महत्त्वाचे स्थान होते. या मूल्यांचा आजच्या भारतीय समाजव्यवस्थेत असलेला संदर्भ विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मांडले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता, वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि सामाजिक व राजकीय विषयांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.

सदरील स्पर्धेत वैभवी वारद, प्रिया सूर्यवंशी आणि श्रद्धा मजगे यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केले. विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एन. जी.येमेकर आणि उपप्राचार्य डॉ. ए. ए. कळगापुरे यांच्या हस्ते ग्रंथ बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डी. व्ही. बंडे आणि प्रा. एम. डी. मुसणे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाच्या आयोजन राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.डी. आर.होनराव,प्रा.बी.बी.राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अशा शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना गायकवाड तर आभार श्रद्धा भालेराव यांनी मानले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *