विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी खेळाकडे विशेष लक्ष द्यावे – भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी खेळाकडे विशेष लक्ष द्यावे - भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आल्याने ते मैदानी खेळापासून दूर गेले आहेत. जीवनात सर्वांगीण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मुलांनी अभ्यासासोबत खेळाकडे विशेष लक्ष द्यावे असे आग्रही प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांनी केले आहे.ते आज दिनांक चार रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये बॉल बॅडमिंटन आणि सॉफ्टबॉल टेनिस खेळांच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शितल मालू, प्रमुख अतिथी म्हणून इन्नर व्हील क्लब च्या सचिव वर्षा मंदाडे, योगशिक्षिका प्रेमा वतनी ,योग गुरु कलावती भातांब्रे, उद्योजक संजय गौंड,मुख्याध्यापक आशा रोडगे,मुख्याध्यापक मीना तोवर,क्रीडा शिक्षक एस.जी. जहागीरदार, एल. अभिजीत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. इन्नर व्हील क्लब च्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्यालयाची हॅपी स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे.यावेळी चंद्रयानाची प्रतिकृती तयार करणाऱ्या प्रथम,द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना इन्नर व्हील क्लब च्या वतीने बक्षीस देण्यात आले. क्रीडा शिक्षक एस.जी.जहागीरदार, क्रीडा शिक्षक एल.अभिजीत, प्रेमा वतनी, शीतल मालू यांची मनोगत पर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले सूत्रसंचालन संगीता आबंदे यांनी केले तर आभार कलावती भातांब्रे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author