दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतमजूर आणि बांधकाम कामगारांना अर्थसाह्य करा – स्वप्निल अण्णा जाधव

Written by

in

उदगीर (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरडा दुष्काळ पडलेला आहे. शासनाने देखील दुष्काळ मान्य करून अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये मदतीची घोषणाही केली आहे. ही मदत अत्यंत तोकडी आहे. याच पार्श्वभूमीवर दुष्काळामुळे शेतमजुरांना काम मिळत नाही, हाताला काम नाही त्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने नैतिक जबाबदारी ओळखून त्यांना अर्थसहाय्य करावे. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारने बांधकाम कामगार त्या मध्ये प्रामुख्याने गवंडी काम करणारे कामगार, सुतार काम करणारे कामगार, इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि नळ फिटिंग करणारे कामगार, पेंटर आणि रंग काम करणारे कामगार, वेल्डर व लोहार, मार्बल आणि ग्रॅनाईट कट करणारे तसेच फरशी बसवणारे कटर चे काम करणारे कामगार, उत्खननामध्ये काम करणारे कामगार, रस्ते बांधणीच्या कामामध्ये काम करणारे कामगार, सुरुंग भरणे किंवा माती काम करणारे मजूर, पावर प्लांट, डॅम, बोगदा किंवा पूल बांधकाम करणारे कामगार, साच्या बनवणारे कामगार, लोखंडी बांधणी करणारे कामगार, विहिरी खोदणारे कामगार, इंटेरियर डेकोरेशनचे काम करणारे कामगार, वीट भट्टीवर काम करणारे किंवा वाहतूक करणारे कामगार, वाळू, सिमेंट वाहतूक करणारे किंवा इतर कामे करणारे मजूर इत्यादींच्या संदर्भामध्ये अनेक योजना लागू करून त्यांना मदतीचा हात दिला होता. यांना ही तातडीने अर्थसहाय्य करावी अशी ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे.

इमारत बांधकाम कामगार कल्याण महामंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळतो. तसा लाभ मिळावा म्हणून गेल्या अनेक दिवसापासून अनेक कामगारांनी अर्ज फाटे केले आहेत. मात्र त्यांचे प्रलंबित अर्ज कधी निकाली निघतील? हे सांगता येत नाही. अशी परिस्थिती आहे. कित्येक कामगारांचे रिन्यूअल होणे बाकी आहे. त्यातही अनेक अटी आणि शर्ती मध्ये या कामगारांना अडकवून टाकण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची होणारी अडचण दूर करून त्यांना देखील दिवाळीपूर्वी शासनाने अर्थसहाय्य करावे. अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे.

बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये कामगार नेते महादेव शेळके, शेख जम्मू मुसा, अंतेश्वर सूर्यवंशी आणि इलाही पठाण हे गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी कामगारांच्या हिताच्या मागण्या करत आहेत. मात्र त्याकडेही शासन दुर्लक्ष करत असल्याची खंत स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे. बांधकाम कामगारांच्या मागण्या तात्काळ मंजूर करून त्यांच्या मुलांसाठी असलेल्या योजना पूर्ववत सुरू कराव्यात, तसेच फेर नोंदणी संदर्भामध्ये त्यांची होणारी अडकाटीही दूर करावी. अशी ही मागणी स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे.

इतर वेळा राजकारण केले तर चालते, मात्र सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कष्टकऱ्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्यांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. त्यामुळेच शेतमजूर आणि नोंदणीकृत किंवा नोंदणीसाठी अर्ज दाखल केलेले कामगार यांना दिवाळीपूर्वी अर्थसहाय्य करून त्यांचा सण साजरा करावा. अशी ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *