उदगीरच्या मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उषा कुलकर्णी यांना संगणक विषयात पीएचडी प्रदान

Written by

in

उदगीर (एल पी उगीले) येथील मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा भीमराव कुलकर्णी यांना संगणक विषयात ‘पीएचडी’ (विद्यावाचस्पती) पदवी जाहीर झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मातृभूमी विद्या संकुलाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

प्राचार्या डॉ. उषा कुलकर्णी यांनी “अ नॉव्हेल डीप एन्सेंबल लर्निंग मॉडेल फॉर मेडीकल डिसीज डायग्नोसिस : डिझाईन, इव्हाॅल्युव्हेशन अँड परफॉरमन्स अनॅलिसीस” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी डॉ. संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले.

या संशोधनात डॉ. संजय कुमार, तसेच तज्ज्ञ समितीचे सदस्य म्हणून डॉ. सुधीर कदम (डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे) व डॉ. उमर मुलानी (एमआयटी एडीटी, पुणे) यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. अभीजीता नाडा, डॉ. हर्षा पाटील, डॉ. टिकम साहू, डॉ. गोविंद घोगरे, अनुराधा वर्मा, दयानंद कॉलेज लातूरच्या डॉ. रोहिणी शिंदे, सोनखेड येथील डॉ. हणमंत आगलावे, संस्थेचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, डॉ. साईनाथ भोसले, प्रा. अमर तांदळे, सुधीर पाटील, संजय राठोड, डॉ. पंडित देवशेट्टे, प्रा. रामदास मलवाडे, शिवाजी गिरी, दयानंद मठपती, संतोष जिरोबे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मातृभूमी विद्या संकुलात सत्कार

संशोधन क्षेत्रातील या यशाबद्दल मातृभूमी विद्या संकुलात प्राचार्या डॉ. उषा कुलकर्णी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रा. बिभीषण मद्देवाड, प्रा. रणजित मोरे, प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. अन्वेष हिप्पळगावकर, प्रा. शिवांगी वट्टमवार, राहुल जाधव, दयानंद टाके, विवेक देर्वष, उषा साताळकर, मीरा पाटील, नेहा वाघमारे, रुतुजा दहीकांबळे, रेखा रणक्षेत्रे, जगदिषा ओंकारे, मुबारक पटेल, दत्ता जाधव, अर्चना बिराजदार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. उषा कुलकर्णी यांना पुढील वाटचालीस व उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा दिल्या.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *