शहरात येणे सुलभ व्हावे म्हणून महानगरपालिका शहर बस वाहतूक सेवेचा अनेक मार्गावर विस्तार
लातूर (प्रतिनिधी) : शहर महानगरपालिका शहर बस वाहतूक व्यतिरिक्त अतिरिक्त सहा ठिकाणी विस्तारित बस सेवा सुरू करण्यास राज्य परिवहन महामंडळाकडून ना हरकत देण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत आज बांधकाम भवन तेथून गंजगोलाई ते गंगापूर विस्तारित शहर वाहतूक बससेवेचा शुभारंभ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी अमित देशमुखांनी बस मधून प्रवासदेखील केला. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महापालिका विरोधी पक्षनेते अँड.दिपक सुळ यांच्यासह नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते.