गजानन साताळकर सामाजिक जाणिवा जपणारा कार्यकर्ता – श्रीकांत पाटील
उदगीर (एल.पी .उगिले) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काम करणारा युवा कार्यकर्ता गजानन साताळकर हा सामाजिक जाणिवा जपणारा कार्यकर्ता असून समाजातील गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत अग्रेसर राहतो. समाजातील गोर गरिबांचे प्रश्न मिटावेत, यासाठी त्यांची चाललेली धडपड कौतुकास्पद आहे. असे विचार सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते गजानन सातारकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शेख समीर, अशोक कांबळे, जनकराज जीवने, कल्याण बिरादार, उमाकांत गुंडाळे, ज्ञानेश्वर मोरे, संतोष सुर्यवंशी आणि चंदरअण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, गजानन सताळकर यांची एकूण कारकिर्द ही सकारात्मक राजकारणाची असून समाजाचं भलं करण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त वेळ दिलेला आहे. त्यांनी रा का नेते बसवराज पाटील नागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले काम हे उल्लेखनीय असून त्याची दखल सर्वजण घेत आहेत.त्यांच्या कामाची नोंद फुलेनगर आणि परिसरात जनता कधीच विसरणार नाही असे आहे. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व जनसामान्यांच्या मनावर ठासून भरले आहे असे श्रीकांत पाटील यांनी सांगितलेक सत्काराला उत्तर देताना गजानन सातारकर यांनी सांगितले की, मी जो काही आहे तो बसवराज पाटील नागराळकर साहेब आणि त्यांच्या आशीर्वादाने आहे, व्यक्तिशः कोणतेही मोठे काम नाही किंवा नागराळकर यांच्या आशीर्वादाशिवाय माझे अस्तित्व नाही. या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन श्रीकांत पाटील यांनी केले.