शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी लढा उभारावा- दीलिपराव देशमुख
उदगीर ( एल.पी. उगिले ) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यावर सतत अन्याय केला जातो आहे. या अन्यायाच्या विरोधात लढा उघडण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटित होऊन काम करावे. संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भारतीय किसान मोर्चा “गाव तिथे शाखा” हा उपक्रम राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली उदगीर, जळकोट येथे आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला उद्देशुन दिलीपराव देशमुख बोलत होते.
पुढे बोलतांना त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने सर्वसामान्य जनतेचा वापर केवळ सत्ता भोगण्यासाठी केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात लढा उभारून हिंमतीने काम करावे. आपला पक्ष सर्वसामान्य माणसाचे हित जोपासणारा आणि लोककल्याणकारी योजना राबवणार असल्याने आपल्या योजना, आपल्या पक्षाची ध्येय धोरणे आणि केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान सन्मान योजना सुरू करून अस्मानी संकटांना शेतकऱ्यांनी घाबरून न जाता हिमतीने पुन्हा उभे राहावे. यासाठी शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्याची महत्वकांक्षी योजना त्यांनी प्रत्यक्ष राबवून दाखवली आहे. या योजनेत आणखी वाढ करण्याची शक्यता देखील आहे. लोकहिताचा विचार करणार्या आपल्या नेत्याची भूमिका ही सर्वसामान्य जनतेला माहीत होणे गरजेचे आहे. ते काम तळागळातील कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर करणे गरजेचे आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता सामाजिक जाणिवा म्हणून भारतीय जनता पक्ष लोकहितकारी योजना राबवत असल्याचे लोकांना पटवून द्यावे. असेही आवाहन दीलीपराव देशमुख मालक यांनी याप्रसंगी केले. जळकोट येथील या बैठकीसाठी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामराव एकलारे, अमदपुर तालुका उपाध्यक्ष दत्ता गोरे, ऍड. सुधाकर जगताप, बालाजी तिडके, बालाजी केंद्रे, शिवाजी डुकरे, बालाजी मालुसरे, रत्नाकर गुट्टे, बालाजी सिंदगीकर, भाऊराव कांबळे, जगन्नाथ मैलारी, दत्ता वंजे ,निलेश गडकर, रामकिशन पवार, दयानंद रेड्डी ,अजित गुटे, रमेश चोले, बाबुराव गुटे, अरुण केंद्रे ,उत्तमराव जाधव हे तर उदगीर येथील बैठकीसाठी माजी आमदार गोविंद केंद्रे ,किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी (भालके), रमेश पाटील मलकापूरकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित सुकणीकर, पांडुरंग कोनाळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी गाव तेथे शाखा स्थापन करून किसान मोर्चाच्या शाखेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करावे. असेही आवाहन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख मालक यांनी याप्रसंगी केले.