Police Flash News

लातूरच्या ईदगाह मैदानावर पावसासाठी नमाज-ए-इस्तिस्का. शेतकरी,पिके आणि जनतेवरील पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे यासाठी दुआ.

0
6
लातूरच्या ईदगाह मैदानावर पावसासाठी नमाज-ए-इस्तिस्का.
शेतकरी,पिके आणि जनतेवरील पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे यासाठी दुआ.



लातूर (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यात पावसाअभावी शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली असताना, पावसासाठी रविवारी सकाळी ईदगाह मैदान येथे नमाज-ए-इस्तिस्काचे पठण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून अल्लाहकडे भरपूर आणि लाभदायक पावसासाठी दुआ केली.यावेळी मुफ्ती सोहेल कास्मी यांनी प्रवचनातून पावसासाठी दुआ करण्यासोबतच समाजातील प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून अल्लाहची क्षमा मागावी, जकात अदा करावी आणि अन्याय-अत्याचारापासून दूर राहावे, असे आवाहन केले.अल्लाह सर्वस्वी दयावान आणि दयाळू आहे. पावसासाठी दुआ करताना आपल्या कृत्यांचा विचार करून क्षमा मागणे हे आपले कर्तव्य आहे. जकात काढणे आणि गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणेही आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होत असून, नागरिकांमध्येही पाणीटंचाईची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पावसाची गरज आहे, त्या ठिकाणी रहमतचा पाऊस बरसावा, कोरड्या पडलेल्या शेतांना हिरवाई लाभावी आणि पिकांना जीवदान मिळावे, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

यावेळी करण्यात आलेल्या दुआमध्ये, “या अल्लाहा, रहमतचा पाऊस बरसव. शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ दे, पिकांना जीवदान दे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षी-प्राण्यांवरही रहमत कर. प्रत्येक घरात सुख-समृद्धी नांदू दे,” अशी आर्त विनवणी करण्यात आली.

पावसाअभावी शेतकरी, नागरिक तसेच पशु-पक्ष्यांची होणारी परवड दूर व्हावी, लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडावा आणि पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे, यासाठी उपस्थितांनी सामूहिकपणे दुआ केली.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )



















Related posts