Police Flash News

सरकारच्या आश्वासन पूर्तीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक, गरज पडल्यास आंदोलन – स्वप्निल अण्णा जाधव

0
31
सरकारच्या आश्वासन पूर्तीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक, गरज पडल्यास आंदोलन – स्वप्निल अण्णा जाधव

उदगीर (प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासन सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. विकासाचा दर केवळ दीड टक्क्यावर येऊन पोहोचला आहे. कित्येक विकास कामे अर्धवट राहिले आहेत. या सर्व गोष्टीची जाणीव सरकारला करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेने नेते महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ. अंबादासजी दानवे यांच्या संकल्पनेतून व शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या सूचनेनुसार उदगीर तहसील कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर 2016 मध्ये अनेक योजनांची बरसात केली होती. त्याच पद्धतीने 16 सप्टेंबर 2023 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उदगीर तालुक्यातील विविध प्रकारच्या विकास कामांच्या पोकळ वल्गना केल्या होत्या. त्या योजना आजपर्यंत कार्यान्वित करण्यात आल्या नाहीत. उदगीर तालुक्यातील खाजगी उदयगिरी औद्योगिक वसाहत येथे पाणीपुरवठा नाही, या वसाहतीसाठी स्वतंत्र वीजपुरवठा केला गेला नाही. तसेच शेतकरी बांधवांना तात्काळ पिक विमा मंजूर करून द्यावा. शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा. कोरडा दुष्काळ जाहीर करावा. सन 2025 मध्ये अतिवृष्टी झाल्याचे घोषित केले पण शेतकरी बांधवांना एक रुपयाही मिळाला नाही. उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्ते पूर्ण कधी होणार? हा प्रश्न गंभीर आहे. या विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशन चे काम अर्धवट राहिलेले आहे. कित्येक कामे हे बंद पडली आहेत. तसेच उदगीरचे नाट्यगृह आणि भुयारी गटार योजनेतील भ्रष्टाचार थांबला पाहिजे. शेतकरी बांधवांच्या उसाला तीन हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. यासाठी व महायुतीच्या सरकारने जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी आता हे सरकार करू शकणार नाही म्हणून महायुतीचे सरकारच्या विरोधामध्ये “तुमसीे ना हो पायेगा” हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, त्या अनुषंगाने रीतसर निवेदन व धरणे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, तालुकाप्रमुख प्रशांत मोरे, शहर प्रमुख बालाजी सोनाळे, विधानसभा समन्वयक व्यंकट साबणे, उप तालुका प्रमुख महेश फुले, युवा सेना जिल्हा सरचिटणीस रमण माने, युवा सेना चंद्रकांत सांगळे, महिला आघाडीच्या अरुणाताई लेंडाने, शिवकांत चटनाळे, शिवा मोरारीकर, मुन्ना पांचाळ, मनोज फुले, शहर संघटक महेश येरकुंडे, अनिकेत काळेगोरे, सरोजा बिरादार, सुनिता वाघमारे, गंगुबाई कंजे, प्रेमिला जाधव, प्रतिभा जाधव, मीराताई कांबळे, अर्चना सोनकांबळे ,श्वेता गायकवाड ,मंगलाताई घोगरे यांच्यासह अनेक शिवसैनिक या प्रसंगी उपस्थित होते.

सरकारने आपल्या आश्वासनाची पूर्तता नाही केल्यास नाईलाज म्हणून शिवसेनेला आपल्या स्टाईल आंदोलन करावे लागेल असा इशाराही याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांनी दिला आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )



















Related posts