अहमदपूर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १० जणांविरुद्ध कारवाई.

Written by

in

लातूर (एल पी उगीले) तिर्रट जुगार खेळताना १ लाख १३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये मोबाईल व रोख रकमेचा समावेश आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की,

पोलीस स्टेशन अहमदपूरच्या पथकाने दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी मरशिवणी तांडा येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या १० जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत जुगाराचे साहित्य, ९ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ लाख १३ हजार ९७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास अहमदपूर पोलिसांनी मरशिवणी तांडा येथील शेतशिवारात, सुरेश लक्ष्मण सांगविकर यांच्या शेतातील जुन्या बांधकामाच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. यावेळी आरोपी लोकांकडून पैसे घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, ९ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १,१३,९७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळणारे मधुकर हरीबा कांबळे, (वय ५५ वर्षे, रा. सिद्धार्थ नगर, अहमदपूर),अंकुश रामराव राठोड, (वय ३८ वर्षे, रा. मरशिवणी तांडा, ता. अहमदपूर), रामेश्वर वासुदेव मारडकर, (वय ४८ वर्षे, रा. विळेगाव, ता. अहमदपूर), दयानंद बाबुराव चव्हाण, (वय ३५ वर्षे, रा. कराड नगर, अहमदपूर),चंद्रकांत बाबुराव जाभाडे, (वय ४० वर्षे, रा. बौद्ध नगर, अहमदपूर), संतोष गोविंद येमले, (वय ४१ वर्षे, रा. लिंगदाळ, ता. अहमदपूर),मोहम्मद सलीम अहमद, (वय ५५ वर्षे, रा. हामणे गाव, ता. अहमदपूर),सजाद आसिफ शेख, (वय ४८ वर्षे, रा. नांदेड रोड, अहमदपूर),

जगन्नाथ भागवतराव शिंदे, (वय ६२ वर्षे, रा. थोडगा रोड, अहमदपूर),

बालाजी सूर्यकांत बेलाळे, (वय ३९ वर्षे, रा. सराफ गल्ली, अहमदपूर)असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची ची नावे असून या प्रकरणी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९६/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मेत्रेवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *