परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रम

परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रम

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण सप्ताह (कँम्प) चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे आज शुक्रवार, दि.25 मार्च रोजी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेट चा सर्वोपयोगी उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी तहसील मधील राशनची होणारी दलाली बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केली. फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचे शिबीर सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल अरूणोद्दय मार्केट येथे शुक्रवार दि.25 ते 27 मार्च पर्यंत होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसिलदार बाबुराव रूपनर, मंडळ अधिकारी कुमटकर, पुरवठा विभागाचे कालिदास पवार, राजाभाऊ लव्हारे, केंद्रे, विठ्ठल साखरे, संतोष गित्ते, कृष्णा बळवंत, संदिप सुधाकर काळे, संतोष आघाव, अरूण रोडे, विश्वजित मुंडे, माऊली मुंडे, गणेश शिंदे यांची उपस्थिती होती. गरीब, गरजु व सर्व सामान्य जनतेचे गेल्या विस ते तिस वर्षापुर्वीचे राशन कार्ड दुरूस्ती व अपडेट , खुप जुने झाल्यामुळे फाटलेले, झिजलेले, व खराब जालेले राशन कार्ड त्यांना नुतनीकरण करून देणे, आपडेट नसतील तर ते अपडेट करून (१२ अंकी नंबर) नाव कमी किंवा नावलावून देणे गरजेचे आहे. कारण गरीब, गरजु, शेतकरी, कामगार वर्ग, सर्व सामन्य जनता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक विधवा महिला इत्यादी समाजातील गरजू घटकास आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास, बँकेत बऱ्याच व्यवहारात राशन कार्ड अती महत्वाचे असते /लागते यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे.
शिबीराच्या पहिल्या दिवशी गरजुंनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी मान्यवरांचे स्वागत डॉ.संतोष मुंडे यांनी केले. या शिबिरात 980 नोंदणीझाली. तर 387फाटलेले राशनकार्ड जागेवर दुरूस्ती करण्यात आले.(पिवळे व केसरी )25 वर्षांपासूनचे राशनकार्ड फाटलेले, दुरुस्ती करण्यात आले. दिवसभर नागरीकांची गर्दी शिबीरात होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल साखरे यांनी केले. आभार गणेश गुट्टे यांनी मानले.

About The Author