शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी असे कार्यक्रम महाविद्यालयात वारंवार व्हावेत – प्राचार्य रेखाताई तरडे
अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले कलात्मक गुण दाखवावेत प्रत्येक माणसाच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारची सुप्त गुण दडलेले असतात ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून बाहेर पडतात व याचा फायदा विद्यार्थ्यास होतो त्यामुळे सर्वांनी संधी मिळेल त्या ठिकाणी आपल्या अंगी असलेले सुप्त गुण बाहेर काढावेत व महाविद्यालयांमध्ये असे कार्यक्रम वारंवार व्हावेत त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेले सुप्त गुण बाहेर काढण्याची संधी मिळतील असे मत बालाघाट तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात ‘उत्कर्ष 2022’ या कार्यक्रमात अध्यक्षीय मत प्राचार्य रेखाताई तरडे यांनी मांडले. बालाघाट तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ‘उत्कर्ष 2022’ चे आयोजन करण्यात आले होते आज संस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा महिला जिल्हा अध्यक्ष भाजपा प्राचार्य रेखाताई तरडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संचालक अमरदीप हाके, संचालिका शिवलिका हाके, संचालक कुलदीप हाके, उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, प्राचार्य ऋत चक्रनारायण,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे यांनी मांडले. बालाघाट तंत्रनिकेतन चा नुकताच निकाल जाहीर झालेल्या विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था सचिव प्राचार्य रेखाताई तरडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उत्कर्ष 2022 निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्याच बरोबर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दैनिक पुढारीचे किनगाव प्रतिनिधी गोरख भुसावळे यांना वाढदिवसानिमित्त संस्था सचिव प्राचार्य रेखाताई तरडे यांच्या उपस्थितीत संचालक कुलदीप हाके यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य नितीन शिवपूजे, आयटीआयचे प्राचार्य मदन आरदवाड, सुहास दहीटनकर, कालिदास पिटाळे, संतोष लातूरे, आरती पुणे, रूपा पाटील, श्रीराम कागणे, मंगेश चव्हाण, बालाजी लवटे,शेख तोहीद, गणेश यामगिर, नीलकंठ नंदागवळे, सिद्धू मासोळे, बालाजी देवक्तते, विजय कुलकर्णी, सतीश केंद्रे, कैलास होनमाणे, संग्राम सुरणर, चव्हाण अशोक, संतोष होनमाणे, केशव तोंडारे, विद्या शिंदे आदींनी परिश्रम घेतले.