महात्मा फुले महाविद्यालयाच्या संपादित दोन हिंदी ग्रंथाचे प्रकाशन संपन्न

महात्मा फुले महाविद्यालयाच्या संपादित दोन हिंदी ग्रंथाचे प्रकाशन संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय संगोष्टीसाठी देशभरातून प्राप्त झालेल्या शोधनिबंधांचे संपादकिय ग्रंथांचे नुकतेच लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, लातूरच्या संत कबीर प्रतिष्ठानच्या वतीने प्रो. डॉ. अंबादास देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त सांस्कृतिक मंत्रालय महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र साहित्य अकादमी मुंबई, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व संत कबीर प्रतिष्ठान लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय संगोष्टीमध्ये संपादक डॉ. पांडुरंग चिलगर व उपसंपादक प्रा.डॉ. नागराज मुळे यांच्या 21 वीं सदी और हिंदी कथा साहित्य व 21 वीं सदी और हिंदी कहानी साहित्य या दोन संपादित ग्रंथांचे प्रकाशन राष्ट्रीय संगोष्टीच्या उद्घाटन सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन, प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. महेंद्र ठाकुरदास, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा संकुलातील प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.डॉ.रणजीत जाधव, गुरुमाता श्रीमती विजयादेवी अंबादासराव देशमुख, डॉ. दिलीप गुजरंगे, डॉ. राजेश विभुते यांच्या शुभहस्ते प्रकाशन संपन्न झाले.या मान्यवरांसह विचारमंचावर संपादक डॉ.पांडुरंग चिलगर यांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यातून प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author