सिध्दी शुगर येथे आरोग्य निदान शिबीर संपन्न
अहमदपुर (गोविंद काळे) : तालुक्यातील सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि, महेशनगर, उजना येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, लातुर व प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगारांसाठी कारखाना साईटवर नुकतेच मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले या वेळी २८५ रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात देण्यात आले.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सिध्दी शुगरचे व्यवस्थापकिय संचालक अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सिध्दी शुगरचे उपाध्यक्ष पी.जी.होनराव, वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब बयास, वैद्यकीय अधिकारी डाॅ.जयप्रकाश केंद्रे, समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.नित्यानंद कुंभार,डाॅ.सुभाष नाईक, डाॅ.अमोल राठोड, डाॅ.तनुप्रिया घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरील शिबीरामध्ये ऊसतोड कामगार, सिध्दी शुगर येथील कर्मचारी यांचे बी.पी. व मधुमेह तपासणी गरोदर महिला, थायराईड, कावीळ, लिव्हर, किडनी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या.
सदर शिबीर आयोजित केल्याबददल कारखान्याचे व्यवस्थापकिय संचालक अविनाश जाधव यांनी सर्व वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचा-यांचे तसेच कोवीड १९ काळात सेवा दिल्याबद्दल आभार मानले. शिबीरासाठी जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) एस.बी. शिंदे, अरविंद कदम, परचेस ऑफिसर, धनराज चव्हाण, गार्डन सुपरवायझर हरी पांचाळ, डी.एम.टिळक, सिध्देश्वर स्वामी आदीची उपस्थिती होती.