राशन दुकानाचा बेकायदेशीर परवाना रद्द करा अन्यथा खळखट्टयाक आंदोलन करू – डॉ नरसिंह भिकाणे
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मेथी गावातील बेकायदेशीर राशन दुकान बंद करा अन्यथा खळखट्टयाक आंदोलन करू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी पूरवठा विभागाला दिला आहे.एक वर्षांपूर्वी पुरवठा विभागाकडूनच अनेक त्रुटींवर बोट ठेवत ज्या राशन दुकानाचा परवाना रद्द केला गेला होता तेच दुकान पुरवठा विभागाने बेकायदेशीर परवाना देत परत सुरू करून ग्रामस्थांवर अन्याय केला आहे असे डॉ भिकाणे यांनी सांगितले.एक वेळ राशन दुकान निलंबित केले व काही दिवसांनी त्रुटी सुधारून ते चालू करण्याची परवानगी दिली तर आपण समजू शकतो परंतु जिल्हापूरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना हे दुकान रद्द झाले आहे असे लेखी देऊनही अश्या दुकानाला कुठलीही चौकशी न करता परत चालू करण्याची परवानगी देणे हे बेकायदेशीर आहे.एक वेळ रद्द केलेल्या दुकानाला परवानगी कोणी दिली त्याची चौकशी करून अर्थपूर्ण मदत करत गुन्हेगारांना पाठीमागे घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी व ते बेकायदेशीर राशन दुकान तात्काळ बंद करावे अशी मागणी मनसेने केली असून कार्यवाही नाही झाली तर आमचेही उत्तर बेकायदेशीर च असेल असे डॉ भिकाणे यांनी यावेळी सांगितले.यावेळी अतिष गायकवाड, जयवंत सगर,माधव इरलापल्ले,ज्ञानोबा जाधव,माधव ठाकरे, गणेश वाडकर,लक्ष्मण काळे,सूर्यकांत फुले,संजीव जाधव,प्रशांत इरलापल्ले,बालाजी गुंडरे, बाबुराव वाडकर,गंगाधर मंदाडे, परमेश्वर जाधव,महेश नागमे,पृथवराज नागमे,पांडुरंग ठाकरे, मेघराज नागमे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.