विविध शासकिय अधिकारी यांना हाताशी धरून तालुक्यात गोरखधंदा सुरू – सहदेव व्होनाळे
जिल्हा परिषद सीईओ, गटविकास अधिकारी यांना हातासी धरुन ग्रामीण जनतेला लुटण्याचा अहमदपुर तालुक्यात गोरखधंदा सुरू…….
अहमदपुर (गोविंद काळे) :तालुक्यांतील ग्रामीण भागात महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत अभियान नावाच्या पत्र्याच्या नंबरप्लेट बनवुन सृष्टी पण.स.शि.वि.बहु.संस्था गो.शाळा नागपुर नावाची संस्था काही महिलाची नेमणुक करुन ग्रामीण भागातील ग्रामपंचायतला भेट देऊन सी ई ओ चे आदेश दाखवुन कुटुंबातील माहिती घेण्यासाठी व नंबर प्लेट बसवण्यासाठी चे आदेश दाखवुन ग्रामपंचायतला दवंडी देण्यास सागुण,महिला करवी सर्वे करून प्रत्येक कुंटुबाकडुन तीस रुपये घेत आहेत हि नहाक ग्रामीण जणतेची लुट आहे,…
सदर सर्वेमध्ये ग्रामसेवक, सरपंच, सीईओ, गटविकास अधिकारी अहमदपुर यांचे किती कमीशन आहे.हे कळणे महत्वाचे आहे, मला मिळालेल्या माहितीनुसार सदर लुट गेल्या कित्येक महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यात चालु आहे.
सदर प्रकरणी सदर सर्वेस बळि न पडत जनतेने कसल्याही प्रकारचे पैसे न देता विरोध करावा आणि लुटीपासुन स्वःताच्या बचाव करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सहदेव व्होनाळे यांनी केले असुन
9511820624 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यास सांगीतले आहे.