समाजातील अंधश्रद्धा नष्ट होणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास नाही – वसंत बिबिनवरे
देवणी (प्रतिनिधी) तालुक्यातील नेकनाळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी यांचे तब्येत निधन झाले आहे त्याबद्दल सुरुवातीला दोन मिनिटे मौन पाळून जयंतीला सुरुवात करण्यात आली. डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा ध्वजारोहण डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, माजी सरपंच देविदास पतंगे, उपेक्षितांचे नेते वसंत बिबिनवरे, सहशिक्षक चंद्रकांत मोठेराव, चेअरमन चवणहिपरगा राम बिरादार, विजयकुमार बिरादार, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, भैय्यासाहेब देवणीकर, सरपंच सौ सुनिता कोरे, ज्ञानोबा सूर्यवंशी, पद्माकर सूर्यवंशी, रजनीकांत रणदिवे, सहभोजन विश्वनाथ पिराजी भुतावळे, सुमन सूर्यवंशी, कोमल जाधव, महानंदा गायकवाड, भागीरथा सूर्यवंशी, परभाबाई जाधव, सिंधू सूर्यवंशी, पपेश सूर्यवंशी, रतन जाधव, जयंती समितीच्या अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, उपाध्यक्ष श्यामलाल सूर्यवंशी, सचिव प्रदीप जाधव, इत्यादींची उपस्थिती होती.
यावेळी वसंत बिबिनवरे बोलताना म्हणाले की, समाजातील अंधश्रद्धा पहिल्यांदा नष्ट झाली पाहिजे. बौद्ध आणि मातंग समाज एकत्र येण्यासाठी अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे, आणि विद्यार्थी शाळेत जाऊन अधिकारी बनला पाहिजे. तरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची आपण जाणीव ठेवली आहे. आपण सर्व महापुरुषांची जयंतीचे सार्थक होईल असे प्रतिपादन केले. उन्हाची तीव्रता विचारात घेऊन कार्यकर्त्यांसाठी संतोष रणदिवे यांच्यातर्फे पाण्याच्या जार मोफत देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक गायकवाड सुखानंद यांनी केले तर आभार पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांनी मानले.
