अहमदपुरात जुगार खेळणाऱ्यां 16 आरोपींविरुद्ध कारवाई, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

0
अहमदपुरात जुगार खेळणाऱ्यां 16 आरोपींविरुद्ध कारवाई, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर ( ॲड. एल पी उगीले)
अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात कार्यरत विशेष पथकास अहमदपूर, जि. लातूर येथे एका बारच्या दुसऱ्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.
सदर माहितीवरून, दिनांक 25/04/2026 रोजी, पथकाने अहमदपूर तालुक्यातील, मौजे काजळ हिप्परगा येथील विसावा बारच्या दुसऱ्या मजल्यावर छापा टाकला असता, सदर ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार खेळताना 16 इसम मिळून आले. सदर इसमांना ताब्यात घेऊन, त्‍यांच्याकडून 1,44,750/- रुपयांची रोकड, 1,03,000/- रुपयांचे (14) मोबाईल व 3,40,000/- रुपयांच्या 6 मोटार सायकली असा एकूण 5,87,750/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्‍यांचेविरुध्द अहमदपुर पोलीस ठाणे येथे गुरनं 233/26 कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास अहमदपुर पोलीस ठाण्यातील मपोउपनि स्मिता जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ व पोकॉ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
‘खबर’ हेल्पलाइन वरून माहिती द्या : परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेल्या ‘खबर’ या हेल्पलाइन वर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे द्यावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!