खोटे जॉईनिंग लेटर देऊन चार लाखांची फसवणूक

खोटे जॉईनिंग लेटर देऊन चार लाखांची फसवणूक

पिंपरी (रफिक शेख) : नोकरी लावण्यासाठी तीन लाख ९५ हजार रुपये घेतले. त्यानंतर टाटा मोटर्स कंपनीच्या नावाचे बनावट जॉईनिंग लेटर दिले. दापोडी येथे १७ डिसेंबर २०२१ ते २९ मार्च २०२२ या कालावधीत ही घटना घडली. विजय काशिनाथ तांबे (वय ३८, रा. वाघोली, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फारुख अहमदअली लासकर (वय ४०, रा. खली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सीएमई गेट, दापोडी आणि टाटा मोटर्स कंपनी, पिंपरी येथे फिर्यादीला बोलावून घेतले. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी व त्यांच्या ओळखीचे सुनील लक्ष्मण बगाडे यांच्या मुलींना कामाला लावतो. असे आरोपीने सांगितले.

About The Author

error: Content is protected !!