वर्षा सुनील केंद्रे यांना डॉ.भीमराव आंबेडकर उत्कृष्ट सरपंच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
उदगीर (एल पी उगिले) वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड स्टार्टअप शिक्षा फाउंडेशन दिल्ली च्या वतीने कुमठा खुर्द तालुका उदगीर येथील सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते सुनील केंद्रे यांच्या पत्नी सौ. वर्षा सुनील केंद्रे यांना स्टार्टअप शिक्षा फाउंडेशन दिल्ली वर्ल्ड एक्सप्रेस बुक ऑफ रेकॉर्ड च्या वतीने डॉ.भीमराव आंबेडकर उत्कृष्ट सरपंच राष्ट्रीय पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला. समता बंधुता न्याय महिला सक्षमीकरण ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय, रस्ते तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवून एक आदर्श निर्माण केल्यामुळे हा मानाचा पुरस्कार त्यांना अनेक सामाजिक संघटनांच्या शिफारशीमुळे जाहीर करण्यात आला. त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये गावामध्ये शांतता एकोपा व समानता निर्माण करण्याचे काम त्यांनी केलं, अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी आपले पती युवा नेते सुनील व्यंकटराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले. कुमठा खुर्द या गावांमध्ये आज तागायत जी कामे झाली नव्हती ती त्यांच्या काराकीर्दीत झाली, म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या अभियानामध्ये सहभाग घेऊन आपल्या गावाचे महाराष्ट्रात नाव लौकिक होण्यासाठी पुढाकार घेतला व ते यशस्वीपणे राबवला.
वृक्षारोपण असेल किंवा गावातील प्रलंबित असलेली रस्ते त्यांच्या नेतृत्वात खुले करण्यात आले एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून युवा नेते सुनील केंद्रे आणि त्यांच्या पत्नी उत्कृष्ट सरपंच वर्षाताई सुनील केंद्रे आज सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून पाच महिलांची निवड करण्यात आली, त्यात प्रथम नाव वर्षाताई सुनील केंद्रे यांचं आहे. येत्या काही दिवसात कुमठा खुर्द तालुका उदगीर या गावात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. हा मानाचा पुरस्कार मिळाल्या मुळे अनेक सामाजिक संघटना, पक्ष यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
