नणंद येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
नणंद येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
सकाळी बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे अविनाश रेशमे शिवसेना तालुकाप्रमुख निलंगा यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजा करून मूर्ती व प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी दापका जिल्हा परिषद सदस्य शाहिद लाला पटेल, पंचायत समिती सदस्य किरण पाटील, गावातील राजकुमार पाटील, रंगराव म्हेत्रे, सुरेश लादे, विश्वनाथ टोपण्णा,सिद्धेश्वर लादे,नामदेव म्हेत्रे, धनराज पाटील, , भगवान टाकेकर, बळीराम टोपण्णा, दिगंबर सूर्यवशी, शुभम होगाडे,अमर नांगरे,विशाल लादे,ऋषी म्हेत्रे, अमित पाटील, संतोष घोडके, मधुर बिराजदार, शाम गवारे, दौलत घाडगे, पंकज कानडे, सुरज पाटील, संतोष भोजने , ऋषी झांबरे, जाकेर शेख, व गावातील मान्यवर, युवक, महिला तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.
