शिवसेनेच्या वतीने महात्मा बसवेश्वरांना अभिवादन

0
शिवसेनेच्या वतीने महात्मा बसवेश्वरांना अभिवादन

उदगीर (प्रतिनिधी) जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उदगीर विधानसभा, लातूर ग्रामीण च्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,संदीप कुलकर्णी,अनिल पंचाक्षरी, महारुद्र पाटील,लाखन कांबळे, विक्की गवारे, माधव पटवारी, व्यंकट पटवारी, मारोती गायकवाड, मारोती साळुंखे, संतोष श्रीमंगले,ऍड आनंद बेलके,लहू श्रीमंगले आदी शिवसैनिक उपस्थित होते. याप्रसंगी चंद्रकांत टेंगेटोल यांनी महात्मा बसवेश्वराच्या क्रांतिकारी विचारांच्या संदर्भामध्ये माहिती दिली. 12 व्या शतकात समतेचा संदेश दिला. अनुभव मंडप च्या माध्यमातून लोकशाहीची भूमिका मांडली. अत्यंत क्रांतिकारी अशा पद्धतीचे विचार घेऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे निश्चितच लोकशाहीची बीजे पेरणारी होती. असे नमूद केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!