सामाजिक क्रांतीचे अग्रदूत : महात्मा बसवेश्वर – प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे

0
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत : महात्मा बसवेश्वर - प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे

उद‌गीर (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे होते. यावेळी बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतातून डॉ.मांजरे यांनी महात्मा बस्वेश्वराच्या कार्यावर प्रकाश टाकताना म्हटले की, मध्ययुगीन काळात बाराव्या शतकात खूप मोठी सामाजिक क्रांती त्यांनी घडवून आणली.धर्माची कठोर चिकीत्सा करून वेद आणि पुराणांचा पर्दाफास केला. पहिला अंतरजातीय विवाह घडवून आणला.रुढीप्रथा, परंपरा यांच्यावर कठोर हल्ले केले. जातनिर्मूलन विषयक विचार मांडले. अनुभव मंडपाद्‌वारे लोकशाहीची रुजूवात केली.अशा महान कार्यामुळे त्यांना कृतीशील समाज सुधारक म्हटले जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख तथा मराठी विभाग प्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसंयोजक डॉ. डी. बी मुळे यांनी केले.या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने घेण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!