डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद निमित्त संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थींना भेट
३ कोटी १२ लाख ६७ हजार रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा.
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून लातूर शहरातील विविध प्रभागात संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबिरे घेण्यात आली.यातील पात्र लाभार्थीना येणाऱ्या रमजान ईद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधत पात्र लाभार्थ्यांना त्याच्या आवश्यक गरजांची पूर्तता व्हावी याकरिता देण्यात येणारे अनुदान संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. यात ३० नोव्हेंबर २०२१ अखेर पात्र ठरलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मार्च २०२२ अखेर पर्यंतच्या अनुदानापोटी संबंधित बॅंकांमध्ये ३ कोटी १२ लाख ६७ हजार इतके अनुदान जमा करण्यात आलेले असून मंजूर यादीतील सर्व निराधार लाभार्थ्यांनी आपापल्या बँकेत जाऊन आपले अनुदान रक्कम उचलून घ्यावी असे आवाहन लातूर शहर संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष हकीम शेख, तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार श्रावण उगले,लातूर शहर संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दगडू आप्पा मिटकरी, भालचंद्र सोनकांबळे, मनोज देशमुख, नरेश कुलकर्णी, बरकत शेख, बंडू सोलंकर, अंजली चिंताले, फारूक तांबोळी, राहुल रोडे यांच्या कडून एका प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आलेले आहे.