संत ज्ञानेश्वर विद्यालयात आदर्श शिक्षकांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : सत्यभामा तुरेवाले या आधुनिक सावित्रीने सुनबाई शिवकांता शिंदे-तुरेवाले यांना किडनी देऊन जीवन दान दिले असून आज समाजात अशा आधुनिक सावित्रींची गरज आहे. असे मत गणेश दादा हाके यांनी आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले. यावेळी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक बबनराव गुळवे, मुख्याध्यापक बालाजी बेंबरे,गोपाळ गुट्टे, गणपतराव कानवटे सह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना गणेश हाके म्हणाले की,समाजात सुनेला सासू नको वाटते पण एक आदर्श सासू आणि आदर्श सून एवढा मोठा त्याग त्यांच्यातील सुंदर प्रेमाचा निखळ तारा व त्यांचा आदर्श आज आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर आला.आदर्श व संस्कार क्षम असलेल्या तुरेवाले कुटुंबाचा नुकताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते बेस्ट नेफ्राॅन अवार्ड देवून सन्मान करण्यात आला आहे.
विद्यालयाच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे काजळ हिप्परगा हायस्कूलचे आदर्श मुख्याध्यापक बालाजी बेंबरे सर यांनी लोकवाट्यातून केलेले शाळेचे अवर्णनीय कार्य आणि खंडाळी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक बबनराव गुळवे यांच्या गणित विषयात 100 पैकी100 गुण घेणारे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आहेत. असे उल्लेखनीय कार्य करणारे जि.प.शाळा उजना येथील पदवीधर शिक्षक गोपाळराव गुट्टे आणि गणपतराव कानवटे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्वच सत्कारमूर्ती ने आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सुंदर असे मार्गदर्शन करुन संत ज्ञानेश्वर विद्यालयातील उपक्रमाचे व सुसंस्कारक्षम विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आपल्या शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लेखाजोखा मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी मांडला. याप्रसंगी मुख्याध्यापक उध्दव शृंगारे सह जेष्ठ शिक्षिका मीनाक्षी तोवर मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा तिरुके यांनी केले तर आभार संगीता आबंदे यांनी मानले. हा कार्यक्रम घेण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.