बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये महात्मा फुले यांची जयंती साजरी

बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये महात्मा फुले यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर समर्थक होते. स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, बालविवाहाला विरोध करणे, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देणे हे ज्योतिबांचे मूळ उद्दिष्ट होते. शिक्षणाच महत्व आणि शिक्षणामुळे काय होऊ शकते हे पटवून देणारे अंधश्रद्धा, मान्यता यातून समाजाला मुक्त करण्यासाठी सतत कार्य करणारे असे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले हेच होते. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. आसे मत गणेश हाके यांनी मांडले.

यावेळी हनुमंत देवकत्ते भाजपा ता अध्यक्ष, संचालक कुलदीप हाके, उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, आय टी आय चे प्राचार्य मदन आरदवाड, सुहास दहिटनकर, कालिदास पिटाळे, संतोष लातुरे, बालाजी देवक्तते, बालाजी लवटे, मंगेश चव्हाण, श्रीराम कागणे, विजय कुलकर्णी, विजय पांचाळ,सिद्धू मासोळे, सतीश केंद्रे, कैलास होनमाणे आदी उपस्थित राहून अभिवादन केले.

About The Author