सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे महात्मा फुले यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल रुद्धा तालुका अहमदपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे संचालक कुलदीप हाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी यांच्या विरुद्ध प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली आहे त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले आहेत प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला त्यानंतर पुण्याच्या कॉक्सिट मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत शाळेतील शिस्तप्रिय व हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचं नाव लोकिक होतं असे मत कुलदीप हाके यांनी मांडले. यावेळी संचालिका शिवालिका हाके, प्राचार्य ऋत चक्रनारायण, रवी नरवटे, अनंत उदगिरे, कोंडीबा माने आदी कर्मचारी उपस्थित राहून अभिवादन केले.