कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा कामांना प्रशासकीय मान्यता – आ. बाबासाहेब पाटील

कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा कामांना प्रशासकीय मान्यता - आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर ( गोविंद काळे ) आणि चाकूर तालुक्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधारा कामासाठी १० कोटी ९५ लक्ष ५३ हजार ६०० रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली असुन या मान्यतेबद्दल राज्य शासनाचे आणि मा.ना. शंकरराव गडाख यांचे आमदार यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत सदरील प्रशासकिय मान्यतेमध्ये अहमदपूर तालुक्यातील हाळणी, ब्रह्मवाडी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यास २ कोटी ८६ लक्ष ३३ हजार ९०० रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. चाकूर तालुक्यातील आनंदवाडी बंधारा क्र.१, आनंदवाडी बंधारा क्र.२, जढाळा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यास ४ कोटी ४ लक्ष ५७ हजार रुपये तसेच हिंपळनेर, भाटसांगवी, महाळंगी ४ कोटी ४ लक्ष ६२ हजार ७०० रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

About The Author

error: Content is protected !!