डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 131 तोफांची सलामी

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 131 तोफांची सलामी

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतीने दिनांक 13 एप्रील 2022 रोजी मध्यरात्री 11:59 वाजता 131 तोफांची सलामी देण्यात येणार असल्याची माहिती युवक अध्यक्ष डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी दिली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मित्रमंडळाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री विनायकराव पाटील यांची उपस्थिती रहाणार आहे तर अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती गंगासागरबाई जाभाडे हे उपस्थित रहाणार आहेत.

या सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे अवाहन सम्राट मित्र मंडळाच्या वतीने प्रशांत जाभाडे, गफार पठाण,जिवन गायकवाड, आकाश सांगविकर,अजय भालेराव, नवनाथ भालेराव,विजय भालेराव, सिद्धार्थ वाघमारे, बालाजी मस्के,शरद सोनकांबळे,शरद कांबळे, विलास चापोलीकर, शिवाजी भालेराव, भिमराव कांबळे, संभाजी कांबळे, गणेश मुंढे,मतिन शेख,हषवर्धन हावरगेकर, कैलास भालेराव,मूकूंद वाघमारे,सचिव बानाटे, योगेश जाभाडे, महम्मद पठाण,देवा गुळवे, चंद्रकांत सांगविकर, प्रदिप कांबळे, राहूल गायकवाड, ईश्वर कांबळे,उमेद कचरे,नुरमहमद शेख, राहूल गायकवाड, दिलीप भालेराव आदींनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!